ग्रामपंचायत ओंडली

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

ओंडली ग्रामपंचायत ही इगतपुरी तालुक्यातील एक लहान पण महत्वाची ग्रुप ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत वैतरणा धरणाच्या लगत वसलेली असून त्यामुळे गावातील सिंचनाचा प्रश्न बर्‍याच अंशी सुटलेला आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ अंदाजे 614 हेक्टर असून, शेजारचे सातुर्ली गाव सुद्धा याच ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येते. गावाची एकूण लोकसंख्या 1044 असून, त्यामध्ये अनुसूचित जमाती - 410 व अनुसूचित जाती - 60 आहेत. गावातील मुख्य व्यवसाय शेती असून, दुग्ध व्यवसाय व पोल्ट्री व्यवसाय हे पुरक व्यवसाय आहेत. शेतकरी भातशेती हा मुख्य पीक प्रकार म्हणून घेतात. खरिप, रब्बी आणि उन्हाळी हंगामांमध्ये भाज्या व पालेभाज्यांचे पीक घेतले जाते.

ओंडली २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
अ.क्रं.सभासदाचे नावपदनामप्रवर्ग
1श्री. प्रकाश वाळु खडकेसरपंचअनुसुचित जाती
2श्रीमती सविता अशोक खातळेउपसरपंचजनरल
3श्री. महादु रामजी खातळेसदस्यजनरल
4श्री. चंद्रकांत भिका वाघसदस्यअनुसुचित जमाती
5श्री. सिताराम प्रेमा वाघसदस्यअनुसुचित जमाती
6श्रीमती सविता तानाजी लोतेसदस्यअनु. जमाती
7श्रीमती बेबीबाई पांडुरंग शेंडेसदस्यअनु. जमाती
8श्री. रुपाली विजय खातळेसदस्यअनु. जमाती
अ.नं.कर्मचाऱ्याचे नावपदनामशेरा
1श्रीमती योगिता दादासाहेब मतसागरग्रामपंचायत अधिकारी
2श्री ज्ञानेश्वर राजाराम हंबरेशिपाई
3श्री संपत मोतीरीम गोहाडपाणीपुरवठा कर्मचारी
4श्री शंकर सखाराम हंबरेग्रामरोजगार सेवक

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी